STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational Others

3  

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational Others

गर्द हिरव्या रानी...

गर्द हिरव्या रानी...

1 min
392

गर्द हिरव्या रानी

झाडे हिरवीकंच बहरलेली

नाजूक कोमल हळव्या

फुलांनी झाडे फुललेली...


होऊन मोती दवबिंदू

पानापानावर इथल्या सजले

अलवार करता स्पर्श त्यास

स्पर्शाने त्याच्या अंग भिजले...


निसर्गाची किमया सारी

हिरवाईने वसुंधरा ही नटली

नाहीच कोणता दुसरा स्वर्ग

इथेच ती स्वर्गनगरी थाटली...


गर्द हिरव्या रानी

सजली दवबिंदूची आरास

दिसे त्यात धरा सारीच

टाकी दिपवून या नेत्रास...


राहो अखंड असेच

धरतीचे हे सुंदर रूप सदोदित 

रोजच नव्याने उमलावे

अंगणी हिच्या फुले सुगंधित... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract