तु असायला हवं होत
तु असायला हवं होत
तू असायला हवं होत
कारण नेहमी मला तुझी आठवण येते
माझ्यासोबत काहीही झाल
तरी पाहिले मला तूच आठवतो
नेहमी अस वाटत राहतं
तू असतास आज तर हे अस झालंच नसत
तू असायला हवं होत
तू असतास आज तर मला कोणाचच ऐकून घ्यावं लागलं नसत
मला इतकं कधी कोण बोललंच नसत
तू असायला हवं होत
तुझं घरात असणं
हेच माझ्यासाठी खूप छान असल असत
खरच तू असायला हवं होत
खूप एकटं वाटतं मला घरात कारण तु नाहीये
असतास तू तर मला एकटं एकटं कधीच वाटल नसत
तू असायला हवं होत
सगळेजण माझ्यावर राग काढतात पण
मला माझा राग व्यक्त करायला कोणीच नसत
तू असायला हवं होतं तर सगळं किती छान झाल असत
जे जे मला आज ऐकून घ्यावं लागतं
ते कधी ऐकायलाच मिळालं नसत
आहेत रे खूप सारे तुझ्यासारखे
पण तुझ असणं ते माझ्यासाठी फार वेगळं असल असत
सगळे माझ्यावर राग काढतात आणि मोकळे होतात
पण मला माझा राग मनातच ठेवावा लागतो
कारण राग काढण्यासाठी माझ्याकडे कोणीच नसत
कधी कधी थोडा निघतो मम्मी पप्पा वर
पण त्यांना माझं रागात बोलणं फार टोचत
कोणावर राग काढू मी कारण मला राग व्यक्त करायला
मन मोकळ करायला कोणीच नसत
तू असायला हवं होतं
आज तर सगळ खूप छान असत
मन इतकं भरलं आहे सगळं मनात साठवून
असं वाटतं फुटेल कधीतरी ते
पण मनातलं ऐकून घ्यायलाच कोणी नसत
तू असायला हवं होतं आज तर सगळं खूप छान असत
कोणताही कुठलाही प्रश्न असो तो माझा फक्त तुझ्यावरच येऊन थांबतो कारण
तू असतास आज तर सगळं छान झाल असत
तू असायला हवं होतं
मम्मी पप्पा ला शांतपणे जगता आल असत
पुढची कसलीच चिंता त्यांना सतावत नसती
तू असायला हवं होत
तुझं असणंच माझ्यासाठी खूप मोलाचं असलं असतं
तू असायला हवं होतं सगळं खूप छान झाल असत
