आई
आई
आई हे नाव ऐकताच परिपूर्ण झाल्यासारखे वाटते
आई समोर असली की सगळं जग समोर असल्यासारखे वाटते
आईच्या असल्याने घराला घरपण लाभते
आईच्या मांडीवर अजूनही मला शांत झोप लागते
तिच्या एका मिठीने मी माझं सगळं दुःख विसरून जाते
तिने खूप त्रास सहन केलाय माझ्यासाठी
आता मला खूप काही करायचं आहे तिच्यासाठी
सगळ करेल मी तुझ्यासाठी
पण मला एका प्रश्नाच उत्तर दे ना ग आई
मुलीलाच का ग घर सोडून जावे लागते आई
तुला एकटीला सोडून जायला
मला फार भीती वाटते ग आई
तू थोडा वेळ जरी माझ्या समोर नसलीस तर
माझे मन खूप व्याकूळ होते ग आई
तूच सांग तुला सोडून एकटी कशी ग राहील मी आई
तुझ्या असण्यानेच माझं असणं आहे
तू सोबत नसलीस की माझं जगणंच व्यर्थं आहे
मी खूप भांडते ग तुझ्याशीच
कारण तूच माझी आपली आहेस
तुझ्याविना सगळं जग व्यर्थ आहे ग आई
तू माझ्यासोबत असलीस तरच मला अर्थ आहे ग आई
तुझ्यामुळेच मी आहे ग आई तूच माझं जग आहेस आई
तुझी एक smile मला खूप ऊर्जा देऊन जाते
तुझं माझ्यावर ओरडणं सुद्धा मला खूप आवडत आई
तू माझ्या चांगल्यासाठीच ओरडते
हे मला ठाऊक आहे आई
तुझं माझ्यावरच प्रेम असच रा हूदे
आणि प्रत्येक जन्मी मला तूच आई म्हणून लाभू दे
हीच प्रार्थना त्या देवाकडे
माझं आयुष्य लागू दे तिला
जिच्यामुळे हे आयुष्य मिळालं मला....
