STORYMIRROR

Shivam Madrewar

Abstract Romance

3  

Shivam Madrewar

Abstract Romance

तुझी किती गं वाट मीच पहायचे.

तुझी किती गं वाट मीच पहायचे.

2 mins
259

दिवसभर त्या प्रयोगशाळेत प्रयोग करायचे,

जेवताना तुझ्याच नावाचा घास गिळायचे,

संध्याकाळी तुझे ते छायाचित्र पाहत बसायचे,

आणि तुझी किती गं वाट मीच पहायचे.


सकाळी सकाळी फिरायला जायचे,

पश्चिमेकडे मावळत्या चंद्राकडे पहायचे,

तुझ्या प्रेमाच्या चारोळ्या तेथे रचायचे,

आणि तुझी किती गं वाट मीच पहायचे.


तुझे ते अबोल ओठ कधीतर बोलुन जायचे,

तुझ्या त्या गालावरती हसु फुटायचे,

तुझ्या नेत्रातील काजळ मला घायळ करायचे,

आणि तुझी किती गं वाट मीच पहायचे.


तुझ्या हातातील काचेच्या बांगड्यां वाजायचे,

पायांतील पैंजण गाण्याचा ठेका धरायचे,

माथ्यावरील टिकली तुझी शोभा वाढवायचे,

आणि किती गं वाट तुझी मीच पहायचे.


त्या पहाटेच्या थंड हवांमध्ये कधी फिरायचे,

तुझ्या हातात हात मी कधी धरायचे,

तुझ्या नावासमोर माझे नाव कधी लिहायचे,

आणि तुझी किती गं वाट मिच पहायचे.


तुझ्या त्या आवाजाने माझे दु:ख मिटायचे,

तुझा आवाज खुप ऐकावेसे वाटायचे,

तुझ्या एका शब्दाने माझा दिवस जायचे,

अन् तुझ्या त्या एका शब्दांची मी किती गं वाट पहायचे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract