Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract Others

3.4  

Sarika Jinturkar

Abstract Others

क्षण

क्षण

2 mins
185


मन स्वच्छंदी होऊन वाऱ्यासवे लहरावे 

 धुंद करणारे प्रभातीचे क्षण

 मनाच्या नजरेने कधीतरी टिपावे


वास्तव्यातील कोमळ गंधाळ नाद 

 जगावे निरंतर क्षणाक्षणात  

 अगणित क्षण हृदयाच्या कप्प्यात 

अलगदपणे जपावा मनामनात  


अनेक सुखद क्षण 

दुखानंतरची असते वहिवाट 

 क्षणांना सोबत घेऊन रोज 

उगवते एक आशेची पहाट  


क्षण काही सुखाचे तर काही दुखाचे


सुखाचा क्षण गोड क्षणांनी गुंफलेला 

आठवणीत असलेल्या मधुर स्मृतींनी जपलेला  


क्षण दुःखाचा वास्तव्याने होरपळलेला 

नैराश्याने झपाटलेला मायेने दुरावलेला  


क्षण कधी हसऱ्या शब्दांचा तर 

कधी बोचऱ्या भावनांचा  

कधी प्रेमाचा तर कधी तिरस्काराचा 

कधी जिंकण्याचा तर कधी हारण्याचा

हाच तर आहे मार्ग जीवनाच्या प्रवासाचा  


प्रत्येक क्षण असतो महत्वाचा 

जर केला सकारात्मक विचार  

आपण आपल्या आयुष्याचा 

 नकारात्मक विचार जर असतील आपल्या मनामध्ये कुठल्याही क्षणी चुकू शकतो निर्णय महत्त्वाचा  


क्षण असतातच काही 

आनंदाचे काही निराशेचे 

काही आठवणीतले काही विस्मरणातले 

काही खचलेल्या मनाला प्रेरणा देणारे 

अस्तित्वाची जाणीव करून देणारे  

भविष्याचे रंगीत स्वप्न दाखवणारे 

रंगीबेरंगी क्षण हे जगण्यास कारण बनलेले  


काही क्षण नातातल्या निर्मळ 

बंधातून फुललेल्या हृदयस्पर्शी मर्मबंधाचे 

क्षणभर विसाव्यातही स्पंदन दिलेल्या अल्लड स्वप्नांचे


 क्षण असतातच असे काही 

आठवावे वाटत नाही 

काही तर विसरल्या ही जात नाही  


आस प्रत्येकाला, लाभावे क्षण सुखाचे 

त्यागुणी स्वार्थ,अंतरी सुख शोधावे  

करुनी परोपकार  

अश्रू पुसावेत दुर्बलांचे  


क्षणभर सुखाच्या क्षणांसाठी उंच शिखरावर चढता चढता लागला एखादा दुःखाचा डोंगर 

तरी एकदा जगून पहावे मनासारखे  

कारण जगणे अनुभवणे म्हणजे जीवन 

कालांतराने जाणवलेले भाव हेच खरे क्षण म्हणावेत  


क्षणांचा खेळ सारा क्षणाक्षणाला बदलतो, 

काही क्षणात सुरू तर काही क्षणात थांबतो

 

जगावा प्रत्येक क्षण बेभान बेधुंद लाटांसारखा 

गगन भरारी घेणाऱ्या पक्षांसारखा 

संपूर्ण सृष्टीला पांघरून घालणाऱ्या अवकाशासारखा  


आयुष्य क्षणभंगुर...

येणारा दिवस नवीन असतो 

त्याच नावीन्य जपावं 

 श्वास थांबला की आयुष्य थांबत उद्याची चिंता सोडून आजचा क्षण जगायला शिकावं 


 मनाची आतुरता कधी सांगून बघावी मनाला 

कधीतरी मनमुराद भेटून घ्याव क्षणाला  

भरोसा नसतोच कोणत्या क्षणाचा म्हणून जगायला हवा तो प्रत्येक क्षण जो आला आपल्या वाट्याला  

भाग्यवंत होऊन, लावावा सार्थकी प्रत्येक क्षण मिळालेला


 वेळेचा धावत्या कालचक्रात क्षण  

जातात अलगद विरघळून 

आठवणींची पान चाळतांना मग आपण पाहत राहतो सारखं मागे वळुन  


कधी चेहऱ्यावरच स्मित हास्य कधी डोळ्यात अश्रुंच्या धारा जेव्हा जेव्हा उघगडला जातो त्या सुंदर अनमोल क्षणांचा जुन्या आठवणींचा पसारा 

त्यातूनी निराशेचे क्षण काढून टाकावे 

धुंद स्मृतीत हर्षित समजून उमजून साऱ्या क्षणांना फुलापरी जपावे  


अर्थांना न्याय देऊ शकतील असे शब्द फार कमी असतात भावनांना व्यक्त करतील असे क्षणही दुर्मिळ असतात म्हणून

क्षण काही हवेहवेसे, 

हृदयाच्या कप्प्यात अलगद जपावे

माणिक-मोती क्षणांचे सुरक्षित त्यात साठवूनी ठेवावे  

 क्षणभंगुर आयुष्य हे क्षणाक्षणांच्या लाटांवर 

मनसोक्त झुलत जावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract