ललित लेख
ललित लेख
नात्यांमधे जेव्हा आपलेच देतात धक्का त्या चिखलाने माखलेल्या, निसरड्या वाटेवर, आणि अचानक तोल जायला लागतो, तेव्हा अनपेक्षित पणे तुझ्या आधारचा हात सावरतो मला. नाहीच पडू देत तू मला त्या चिखलाने माखलेल्या वाटेवर, आणि नाहीच लागु देत कुठलाच डाग तू माझ्या श्वेत वस्त्रांवर, चारित्र्यावर......तुझ्या विश्वासाचा भक्कम आधार मिळतो मला सावरायला, त्याच विश्वासाने तू मला परत त्याच नात्यांमधे पाठवतोस, पुन्हा त्या नात्यांची घडी नीट करायला,पण ते नातं माहिती नाही कुठल्याश्या अविश्वासाने ग्रस्त असतं,कितीही प्रयत्न केले तरी ते नातं बहरून येत नाही. पण तू मात्र कायम मला त्या नात्यात सुख, विश्वास, आपलेपणा शोधायला लावतो .... मी करतेही प्रमाणिक प्रयत्न.....दवबिंदुने आळू च्या पानांना ओले करण्याचा अट्टाहास करावा तसा.....लाजाळू च्या रोपट्यला हाथ लावला कि ते जस लगेच चिमुण जात आणि थोड्याच वेळात परत पूर्ववत होतं तसे मी पुन्हा, नव्याने तयात होते त्या नात्याच जीव ओतण्यासाठी. तोच तोच अपमान,अवहेलना सहन करत....प्रचंड ताण येतो रे मनावर त्य सर्व गोष्टींचा......पण ज्यांच्या लेखी माझी किंमत शून्य आहे. मी आहे काय आणि नाही काय, काहीच फरक पडत नाही तिथे. माझ्या प्रयत्नांना तरी काय अर्थ असणार ना?.......पण तू खरा गुरु आहेस, माझ्या आयुष्याचे सारे गणित चुकत आले तरी तुला वाटते मी परत केले ते तर येणारे उत्तर चुकणार नाही, ते बरोबरच असणार आहे. पण नही रे! माझ्या आयुष्याची सूत्रच चुकीची लागली आहेत. मग उत्तर बरोबर कसे येणार . कीतीही सुखाने गुणले तरी उत्तर दु:खच येत. .........तुला कसा रे विश्वास असतो, मला तर कायम वाटत असत की सुख म्हणजे मृगजळ, कितीही त्याच्या मागे धवाले तरी ते हाती लागणाऱ नाही. तू मात्र एका निश्चई विश्वासाने मला ते मिळवून देण्याच्या मागे असतो, कधी कधी ना मला विश्वास वाटतो तुझ्या विश्वासावर. पण तू का करतो माझ्या साठी इतके? तुझे माझे नाते काय आहे,मी तुझी अशी कुणीही नाही लागत जिच्या साठी तू समाजाचे नियम सुद्धा मोडायला तयार असतोस.... असे कितीतरी प्रश्न पडतात मला, पण सारे अनूत्तरितच राहतात........आणि तू शोधू ही देत नाहीस ते.......तू म्हणतो कि या नात्याला नाव नको द्यायला, हे असेच राहू दे निनावी, नाव दिले कि अपेक्षा वाढतात, आणि अपेक्षा वाढल्या की अपेक्षा भंगांचे ओझे ही वाढते. जबाबदारी वाढते........कसा रे शब्दांमध्ये अडकवतोस तू मला. ज्या गोष्टी नाही पटत मला त्या तू सहज पटवुन देतोस.आता आपलेच नाते बघ ना? हे नैतिक अनैतिकतेच्या पलीकडचे नाते आहे म्हणतोस. बस प्रेम करत रहावे निस्वार्थ भावनेने. प्रेमात केवळ देत जावे. कुठलीही अपेक्षा न ठेवता.........मला कधी कधी कळत देखील नाही तुझी भाषा...... पण आता मी केवळ प्रेम नाही करत तुझ्यावर...तर भक्ती करते तुझी....निस्वार्थ भक्ती.....मिरे सारखी........
