माझे टेक्नोसॅवित्व
माझे टेक्नोसॅवित्व
वीस वर्षांपूर्वीचा काळ खरंच होता चांगला
कुठे होती गाडी, अन् कुठे होता बंगला
पूर्वीचे घर उभी होती प्रेम, माया आपुलकी च्या भिंतीवर
मातीची घर गेली अन सिमेंटची जंगलं आली सुजलाम- सुफलाम या धरतीवर
शेणा मातीनं सारवलेली घर आता कालबाह्य झाली
आता काॅक्रिकेटच्या जंगलात अंगण
दिसू लागली गॅलीरीच्या रूपात
तुळशीवृदांवन ही डुलत
आता त्या छोट्याशा कोपऱ्यात
पूर्वीच्या मोठ्या टीव्ही ची जागा घेतली
आता भिंतीवरच्या टीव्ही ने
ग्रामोफोन, रेडिओ कोण बर वापरत आता....?
पाय थिरकतात आता डीजेच्या,
होम थेटर च्या आवाजाने
पूर्वी मजकूर पत्राच्या माध्यमाने पोहोचायचा
उत्तर येई पर्यंत आठ दिवसाचा तो काळ असायचा
वाट पाहत होते सारे पोस्टमनची ..
आता मोबाईल आला...
वाट असते एखाद्या
चांगल्या मेसेज अन् व्हिडिओची
मोबाईल मुळे काळ हा एका सेकंदावर आला गप्पाचा कट्टा व्हाट्सअप ग्रुप वर सुरू झाला
व्हिडिओ कॉल मध्ये प्रत्यक्षात भेटण्याचा आभास होऊ लागला तासंनतास चॅटिंग वर वेळ हा जाऊ लागला
पूर्वीचे आई बाबा आता मॉम डॅड झाले...
दादा केव्हाच झाला ब्रो...
प्राश्चातीकरण्याचा प्रभाव
आणि भारतीय संस्कृतीचा दिसू लागला अभाव ...
पूर्वी असायची माणसं घरात शंभर साठ
विभक्त झालेली कुटुंब आता असतात इन मिन चार
लहान मूल पाळणाघरात ...थकलेले आई-बाबा आता पाहायला मिळतात वृद्धाश्रमात...
काळ बदलला तशी माणसंही बदलली गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ...
काय ते दिवस होते आमच्या लहानपणी
विचारले असता आजी-आजोबांना सांगितले सुख म्हणजे काय असतं जे त्यांनी होतं अनुभवलं
पुर्वी नव्हती आधुनिक सुविधा उपलब्ध
परंतु त्यांचे जीवन होते तंदुरुस्त
वामकुक्षी करून सर्व दहा वाजता झोपायचे
झोपून लवकर उठल्याने ज्ञान आरोग्य लाभायचे
पूर्वी मुले आजीच्या आजोबांच्या गोष्टी ऐकल्याशिवाय झोपत नसत
आता झोपतात मोबाईलवर गेम खेळत
आता कोणाला कोणाकडे बघायला वेळ नाही पूर्वी सणासुदीला ही घर भरून जाई
पूर्वी आधुनिक सुविधा नसल्याने
गप्पा गोष्टीत रमायचा वेळ
आता सुविधा असूनही दुरावत चालले नात्यांचे मेळ
पूर्वी माणसं एकमेकांना जपत होती
अख्ख गावच वाटायचं एकच घर
किती एकोपा आणि होती किती आपुलकी
गेले सुर पारंब्या आट्यापाट्यांचे खेळ
व्हिडिओ गेमची वाजते आता सतत नवी बेल
पूर्वी बसायची जेवणासाठी पंगत मोठी
आता सोबत जेवणासाठी ही नसतंच कोणी
जो तो आपल्यात असतो व्यस्त
भूक लागली की करतात मग वेफस॔ फस्त
नवे तंत्र ,नवे विचार, नवाकाळ
विसरलो आपण आपला तो जुना काळ
आधुनिक काळातील माणसाचे चाले मोबाईल वर भाष्य पैसे, खरेदी अन बोलणेही बनले आता ऑनलाईन आयुष्य
गरजांच्या मागे पडता पडता आपल
आयुष्यही आता फास्ट झालं
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण
हरवलं त्यात ते सुंदर बालपण अन् आपली संस्कृती...
तो प्रेमानी चिऊताई दाखवत आईने
भरवलेला घास हरवला
डिजिटल शाळेनी अ, आ, ई पाटीवर लिहिणारा
तो खडूही आता आहे पळवला
संस्कार आणि संस्कृती आता फक्त चित्रात चित्रित राहिली
अन स्वप्न नव्या युगाची आता प्रत्येकाच्या मनात आहे कोरली गेली
आता मात्र सगळंच विपरीत घडत असते
जमाना बदलला आहे हे सतत जाणवत असते
कसे कसे गेले ते रम्य दिवस कळलेच नाही
आठवणीचे रंग हातावरी ठेवून ते नाजूक फुलपाखरू कधी उडून गेले कळलंच नाही...
शेवटी हा ही प्रश्न काळ सोडवणार आहे
कारण प्रत्येक प्रश्नाचं काळ हेच तर उत्तर आहे
वीस वर्षांपूर्वीचा तो काळ अन्
आधुनिक तंत्रज्ञानानाच्या जगात फरक आहे फार
म्हणूनच सांगावेसे वाटते
जीवनातले क्षण आहे हे अपुरे
नाही लाभणार आयुष्य दुसरे
फैलावून दे पंख भरारीचे
आणि जग आयुष्य सुख-समाधाने एकदाचे
जगावे आयुष्य झुळझुळ झर्याचे
खडतर प्रवासात गीत गात वाहयाचे
माणुसकी जपणाऱ्या भावनांचे कारण
काळाच्या पडद्याआड एक दिवस आहे जायचे ...
एक दिवस आहे जायचे....🙏😊
