STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Abstract Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Abstract Others

पहिल्या पावसात

पहिल्या पावसात

2 mins
262

गंध ओल्या मातीचा मी, अनुभवी प्रत्यक्षात |

आनंदाने भिजलो मी, या पहिल्या पावसात ||धृ||


सूर्य दिसेनासा झाला, आज भरल्या दुपारी |

चहुकडे अचानक, अंधार पडला भारी  ||

थोड्याच वेळात झाली, गर्दी ढगांची नभात |

आनंदाने भिजलो मी, या पहिल्या पावसात ||१||


माळ तुटावी मोत्यांची, तशी सर खाली आली |

वृक्ष, पाने, फुले, यांची, चिंबुन आंघोळ झाली ||

थेंब   थेंब   पावसाने,  थंडी  भरली  अंगात |

आनंदाने भिजलो मी, या पहिल्या पावसात ||२||


पहिल्या पावसाची ही, ओढ प्रत्येकाला राही |

वाट  चातका  सारखी, शेतकरी  सुध्दा पाही ||

सगळे   आतुरतेने,   वाट   याची   बघतात |

आनंदाने भिजलो मी, या पहिल्या पावसात ||३||


पावसाळा म्हटला की, येतात डोळ्यासमोर |

कांदाभजी आणि चहा, आवडे  लहान थोर ||

मुले  मुली   सगळेच,  आनंदाने   नाचतात  |

आनंदाने भिजलो मी, या पहिल्या पावसात ||४||


पावसाच्या थेंबामुळे, आज अवनी भिजली |

आनंदाने   चोहीकडे,   हिरवाईने   सजली ||

गंध ओल्या मातीचा हा, भरला आसमंतात |

आनंदाने भिजलो मी, या पहिल्या पावसात ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract