STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Abstract Romance

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Abstract Romance

प्रेम तुझं नी माझं

प्रेम तुझं नी माझं

1 min
358

प्रेम तुझं नी माझं

आहे सखी मोलाचं |

नातं पती पत्नीचं

आहे खूप खोलाचं ||१||


प्रेम तुझं नी माझं

राधाकृष्ण समान |

दोन तन एक मन

जोड़ी अमुची महान ||२||


प्रेम तुझं नी माझं

भरी जीवनात गोड़ी |

जणू प्रेमाचे प्रतिक

आहे सारसाची जोड़ी ||३||


प्रेम तुझं नी माझं

वसंतात बहरलेलं |

मोहरीच्या शेतात

जणू सोनं भरलेलं ||४||


प्रेम तुझं नी माझं

सप्तपदी जीवनात |

सूर तुझ्या संगतीत

सप्तसूर गगनात ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract