Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Govardhan Bisen

Abstract Action Inspirational

4.6  

Govardhan Bisen

Abstract Action Inspirational

छत्रपती शिवाजी

छत्रपती शिवाजी

1 min
304


एक राजाची गाथा सांगतो आज |

झाले छत्रपती शिवाजी महाराज ||धृ||


सोळाशे तीसचा तो आनंदाचा वर्ष |

शिवबाच्या जन्माने झाले खूप हर्ष ||

कमी वयातच तोरणावर केले राज ||१||


सोळाशे एकोणसाठमध्ये काबीज |

प्रतापगड, मुगल क्षेत्र झाले नीज ||

शत्रू आदिलशहाचे उतरवून माज ||२||


मुगलासवे झाली मग पुरंदर संधी |

औरंगजेब नी आग्र्यात केले बंदी ||

संभाजी सवे तुरुंगात पडली गाज ||३||


शिवाजीने  मनातच केले  विचार |

फळाच्या टोपलीतून झाले फरार ||

रायगडात येवून केला मग आगाज ||४||


पुरंदरच्या संधीत जे होते हारले |

पुन्हा निज क्षेत्र शिवबाने तारले ||

मनात ठाणले आता हिंदवी स्वराज ||५||


राजा मानायला मराठे नव्हते तयार |

शिवाजीने हे आव्हान केले स्विकार ||

राजा बनून डोक्यावर धराया ताज ||६||


राजा करण्यास ब्राम्हणांचा नव्हता कल |

गागाभट्टास बोलावून काढले त्यांनी हल ||

राज्यभिषेक झाले धारण केले ताज ||७||


अशी ही माझ्या शिवबाची गाथा |

श्रध्देने नमवितो त्यांना मी माथा ||

आनंदाने करुया शिवजयंती आज ||८||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract