STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

त्रेधातिरपीट

त्रेधातिरपीट

2 mins
172

 काळ बदलला...जीवनमान बदललं 

 पूर्वीचा काळ शांत अन् सुखाचा  

सध्याचा हा काळ आहे धावपळीचा...  

पहाट होताच सुरू होते धावपळ

 वेळेत काम व्हावे यासाठी चालू असते 

सतत इकडे- तिकडे पळापळ  

थोडा जरी उशीर झाला मग होतो

 जीव होतो खाली वर

अन् कामे करताना उडते नुसती तारांबळ 

 धावपळ झाली की सुधरत नाही काही  

एकाच वेळी अनेक कामे करताना 

 खूप विचार मग मनात येई 

वेळेत काम व्हायच्या नादात काही गोष्टी

 कळत नकळत पणे चुकून पण जाई...

माणुस म्हटले की चुका या होणारच...

 एखादी कृती एखादा शब्द 

हा निमित्त तेवढ ठरणारच,

कधी ओठांवर हसू तर 

कधी राग हा येणारच  

वेगवान झालेल्या या जगात कामे करताना उडत असते धांदल

संधी जाऊ नये म्हणून होते पळापळ..

आता ही सवय जडली 

धावपळ, कामात होणारी धांदल कधीकधी 

तर अंगवळणी पडली.. 


 माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर..कदाचितच असं होत

 काम अगदी व्यवस्थित रित्या,जबाबदारी पूर्वक पार पाडाव 

एवढंच मनाला नेहमी वाटतं..

ठरवलेल काम पण अगदी

व्यवस्थित रित्या होतं पण कधी कधी  

काय होतं ठरवलं की उद्या 

थोडं उठायचं लवकर

 नेमकं त्या दिवशी होत नाही 

घड्याळीचा गजर  

कधी विचार केला आज थोडं लवकर

काम आटपून देऊया अधिकतर कामाला सुट्टी

 त्याच दिवशी होत नाही 

लवकर कुकरची शिट्टी  

चमचमीत कुरकुरीत काहीतरी करावे

 घरातील धावपळीमध्ये नेमके

तेच करायचे राहून जावे नाहीतर थोडे बिघडावे 

 कधी कपड्यांवर रफू करावा 

 नेमका त्या रंगाचा सुईदोराच त्यात नसावा  

कधी कपड्याचे कपाट छान आवराव  

विचार आला तर हे काम 

आता कशाला करावं  

सतत धावायचं धावतच राहायचं  

कधी आज छान भाजी करावी 

 "नळ आले, पाणी भरायचं" म्हणून 

भाजीची फोडणी करपून जावी...

 मोबाईल आल्यापासून हॅलो हॅलो च्या नादात

सगळच नवीन पद्धतीने पुन्हा जुळून आलं

पण एकदा तर मोबाइल फोनवर बोलताना

मात्र नेमकं जे बोलायचं होत तेच राहूनच गेल.. 

 अशा कितीतरी गोष्टी... आपण धावपळीमध्ये

आणि कामे करताना

उडणाऱ्या धांदल /त्रेधातिरपीट मुळे  

असं काही केल आहे याचं नवल वाटतं

 तर कधी ओठांवरती 

अलगदपणे हास्य ही उमटतं 

जीवन म्हटले की उडणारच ही तारांबळ 

होणारच धांदल म्हणून देवाने दिले

आपल्याला शक्ती आणि बळ 

म्हणूनच कधी कधी वाटत  

सेकंद, मिनिट,तास घड्याळाच्या तालावर

 नाचून नाचून कशाला थकायचं  

नको जीवनात गणित,

 हिशोब वेळ आणि व्यवहाराचं  

गणित मांडाव तर सौख्याच आनंदाचं

 आनंदातून मिळणारया समाधानाच  

निर्भेळ सुख देत देत 

शतायुषी करण्याऱ्या जिवनाचं...

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract