Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract Others

4.5  

Sarika Jinturkar

Abstract Others

जाणीव

जाणीव

2 mins
325


थंड पहाटे किरणे स्पर्शती जीवनांकूर बहरून हळुवार 

जाणीव तव अस्तित्वाची निरंतर निर्गुण-निराकार 👏 


जाणिव नेई पल्याड नितळ मोकळ अवकाश

व्देताव्दैत न भेद उरतो केवळ एक दिव्य प्रकाश  


हवं असलेल न मिळणं ह्याला उणीव म्हणतात आणि जे मिळालं ते जपणं ह्याला जाणीव म्हणतात 

 परिस्थितीच्या चटक्याचा वर्ण म्हणजे जाणीव...  

उणीव कुरवाळत बसावी की 

जाणीव राखावी हा विचार महत्त्वाचा आयुष्य परिपूर्ण समाधानी होईल बाकी प्रश्न प्रत्येकाच्या तत्वाचा...


परंतु आपल्या जीवनात जाणीव ही असावीचं..😊

 

जाणीव असावी कुटुंबाच्या असण्याची मिळालेल्या अनमोल जन्माची क्षणभंगुर जीवनाची, बदलणार्‍या वेळेची

 आपल्यावर अपार प्रेम करणाऱ्या आई-वडिलांची

अविरतपणे कष्ट करून आपल्यासाठी झिजणारया देहाची


जाणीव असावी गुरूजनांनी दिलेल्या आयुष्याला कलाटणी देणारया प्रेरणादायी धड्यांची,


जाणीव असावी कमावलेल्या नात्यांची, स्वतःच्या अस्तित्वाची अनपेक्षित घटनांची....

 

जाणीव असावी सुख दुःख वाटून घेणारया प्रेमळ मनाची अव्यक्त भावनांची, प्रत्येक क्षणी साथ देणाऱ्या सोबतीची 


कुठं काय चुकतं हे सांगू पाहणाऱ्या ,नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीची, जीवनात येणारया समस्या,अडचणीत 

खंबीरपणे पुढे येणाऱ्या प्रेमळ स्वभावाची  


जाणीव असावी त्या सुखद भावनांची ज्यांनी साद घातली मनाला सोनेरी क्षणांची

 जाणीव असावी निखळ प्रेमळ बंधनाची ज्यांनी गुंफली माळ मधुर स्वरांची, बोलक्या नयनांची 


 जाणीव असावी हळव्या त्या व्यथांची ज्यांनी उलगडली कथा खांद्यावरील आधाराच्या हातांची 

 अन् फुलवली अंगणी बाग नव्या हर्षाची 


जाणीव असावी त्या अनोळखी नात्याची ज्याने संवाद साधला असा जणू ओळख ही जन्मांतरीची सार्‍या शब्दांची, लिहले आयुष्य सांगड घालून त्या 

निशब्दाची...  


जाणीव असावी क्षणोक्षणी आपल्याशी 

घट्ट असलेल्या बंधनांची बहरावी नाती त्यात आपुली उमलणाऱ्या सुगंधी फुलांसारखी... 


 जाणीव असावी प्रत्येक आलेल्या सुखदुःखाची एकमेकांना साथ देत गाणे गायलेल्या आठवणींची 

जाणीव व्हावी प्रत्येक शब्दांची, मनसोक्त जगताना धुंदीत कधी तर सैर करून तेल ज्योतीच्या प्रेम रुपी बंधाची...  


जाणीव असावी रम्य सुंदर सौंदर्याची उधळण करणाऱ्या निसर्गाच्या उदारतेची

 जाणीव असावी एक एक दाण्याची 

रक्ताचे पाणी करून सोने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची 

जाणीव असावी निर्मळ जलाची घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या अनवाणी पावलांची

  

जाणीव असावी भारत मातेच्या वीर देशभक्तांची देश रक्षणासाठी जीवाची आहुती देणाऱ्या आपल्या वीर जवानांची.....  


पडता दुःख पदरी अन् जाणीव होते सुखाची

 कशी करवी सांगा आता अवहेलना या सुखदुःखाची  


 जाणीव असावी... स्वअस्तित्वाची 

बदलत जाणाऱ्या या आयुष्याच्या गणिताची.....🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract