Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract

3.8  

Sarika Jinturkar

Abstract

तयारी...लग्नाची

तयारी...लग्नाची

2 mins
1.1K


आज आठवूनी त्या आठवणींना आठवणीत रमली मी

हसूनी त्या हास्यांना क्षणात हरवून गेली मी...☺️😊


अविस्मरणीय क्षण नवीन

आयुष्याची नवी सुरवात 

दोन अनोळखी 

मनाची बांधिलेली रेशीमगाठ 

प्रत्येकाच्या आयुष्यातला

जिव्हाळ्याचा विषय  

लग्न....जरी एक दिवसाचा सोहळा असला तरी

आधीपासून पूर्वतयारी करण्यासाठी होतात घरातील सगळेच त्यात मग्न ....


साखरपुडा पासून सुरु होणाऱ्या अनेक सोहळ्यांची मालिका असते,

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना असते...

आता लग्न म्हटले की, 

केवढी तयारी आली...  

घरी पाहुण्यांचे येणे-जाणे, 

खूप सारी खरेदी

वेगवेगळ्या विधींची तयारी,

लहान मोठी कामे

आणि बरेच काही...

 लग्नाची तारीख जशी जशी जवळ येऊ लागते तसे हृदयाचे ठोके ही वाढू लागतात...

अन् म्हणता म्हणता दिवस ही निघून जातात... 

अनेकदा व्यवस्थित रित्या नियोजन केले तरी ही लग्नाच्या दिवशी थोडा थोडा गोंधळ हा उडतोच... नाही का ...

 

तयारी लग्नाची .....

देवाण घेवाण अन् विविध प्रकारच्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याची...

लग्नाचा अर्थ ....

प्रत्येक विधीतूनच मिळतो सुखी संसाराचा मतितार्थ..


 सुरुवात असते कुंडली जुळून पाहणे 

कुंडली बरोबर विचार जुळतात

 की नाही तेही तपासणे 

 नंतर असतात चहा,पोहे 

पहाणी समारंभ करण्यासाठी 

जुळलं तर टिका, 

नात कन्फर्म करण्यासाठी 

 मग असतात आमंत्रण मानपान देण्यासाठी करतात

मग साखरपुडा सुरुवात गोड होण्यासाठी  

कुटुंबातील आप्तजन ठरवतात

 मग मुहूर्त लग्नाचा  

एकदा तारीख निघाली की,

 मग सुरू होते तयारी


 लग्न सोहळा आनंदाचा 

दोन कुटुंबाला जोडतो

 सासर माहेरच्या धाग्यात संसाराच्या कार्यात बांधतो  

 

 लग्नघरी सजतो मांडव दारी

पानाफुलांनी फेर धरता 

वाजतात बँड,बाजे ही

तयारी ही सुरू असते,

मंगल बेला जवळ येता

 येतात सखे, सोयरे वराडी मित्र काही 

 सुरुवात होता लग्नविधीला 

नवी बंधने नवी नाती 

नवे चांदणे नव्या हाती  

मेहंदीच्या दिवशी जागून राती 

भरते रंग दिव्यात वाती

 सजते रात्र होऊन धुंद पसरतो

 फुलांचा सुगंध

 हसतो मोगराही लाजून,

असते रातरानी सजून  

नवी आशा घेऊन नवी प्रभात उगवते

 गालावर रंग आज पिवळा उठून दिसते  

हळद लागते अंगणी,गप्पा रंगतात 

गातात बायका गाणी

 हळद असते एकमेकाच्या रंगात रंगवण्यासाठी  


हातामधील हिरवाचुडा सौभाग्याचं लेणं 

माहेरच्या आठवणी रुपी जणू आहेर देणं


लग्नाचा दिवस उजाडतो हा आनंदाचा 

 दोन मन जुळण्याचा...


 मंगलाष्टक सुरू होतात 

जीव कातरवेळ होतो प्रत्येकाचा  

शुभा अक्षदा पडताच डोक्यावर 

माता-पित्याचे हृदय पाझरते  

सप्तपदीची गाठ जोडीदाराला 

साथ द्यायला सांगते

 वरमाला करता स्वागत 

एकमेकांच्या आयुष्यात  

बरोबरीचं महत्त्व वाढतं 

एकाच ताटात जेवण्यात 


 पाठवणी असते लेकीची 

असते संस्काराची 

 फक्त स्वागत नसतं सूनेच आशा

 असते घर जोडण्याची  

पाठवणी झाली की आनंद अश्रू पापण्यातून ओघळतात

 आजचा दिवस खास असला तरी 

एकाच वेळी ओठांवर हसू आणि 

डोळ्यात पाणी आणतात  


असा हा सोहळा सुंदर सजला असता सर्व पाहुण्यांची व्यवस्था करण्यास गडबड गोंधळाचा त्रास होत नाही

 योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासोबत

 सगळ्या गोष्टींची तयारी करणे 

वाटले तरी, एवढे सोपे काम नाही....

  

 असा हा लग्नसोहळा व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी तयारी ही 

महत्त्वाची .. लग्नकार्य पूर्ण झाल्यानंतर ची शांतता मनाला खूप मागे घेऊन जाई.. ...


दैनंदिन जीवनात ही तयारी आणि नियोजन आवश्यक असते... त्यामुळेच तर कुठलेही कार्य सुरळीत पणे आणि व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी मदत होते ..बरोबर ना... 🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract