STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract Others

3  

Sarika Jinturkar

Abstract Others

गृहिणी

गृहिणी

2 mins
235

घराला 'घरपण', व प्रसन्नता देणारी 

प्रत्येकाच्या आयुष्याला अथ॔,

प्रत्येक क्षणी मायेचा आधार देणारी

आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करणारी

कुटुंबातील व्यक्तींची आवर्जून काळजी घेणारी  

प्रेमाच्या रेशमी बंधनात सर्वांना एकत्रित बांधून ऋणानुबंध अलगदपणे जपणारी  

कुटुंबाच्या मागे धावताना दमली तरी

 वेदना होत असल्या तरी कुणाला न दाखवणारी  

इतरांसाठी जगतांना स्वतःचे अस्तित्वच विसरून जाणारी

 सर्वांच्या गरजा भागवताना स्वतःच्याच 

 गरजा हृदयात लपवणारी  

प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपतांना स्वतःच्या आवडीची थोडीही कदर न करणारी  

सर्वांचे स्वप्न पूर्ण करताना स्वतःचे स्वप्न सारे अर्धवट सोडणारी..

 दिवस-रात्र राबत असताना सुद्धा फक्त "गृहिणीच" आहे का...? या प्रश्नांचे उत्तर शोधणारी 

काम काहीच करत नव्हती, ती होती फक्त साधारण "गृहिणी"

 शेवटच्या श्वासात एवढेच एकूण जाणारी😌 अशी ही गृहिणी


 दमलेला असला जीव तरीही त्या दमलेल्या जीवालाही ती समजावते ...कुठे थकतोस रे बाबा तू असा अधेमधे....

 तुझ्या छोट्या छोट्या कुरबुरी कडे लक्ष द्यायला खरच वेळ नाही रे माझ्याकडे...

सगळं घर अन् घर तिचीच आस लावून असतं, स्वयंपाक घर ही

 सणासुदीची गडबड पाहुण्यांची वर्दळ  

लहान मोठ्यांची ऐकत असते नेहमीच बडबड👨‍👩‍👦‍👦


 थोरामोठ्यांचा मान... सगळं सांभाळावं लागतं 

 सगळं घर तिच्यावर अन ती घरावर अवलंबून आहे

आता खरंच सांगा...?

 तिला दमायला तरी कुठे वेळ आहे ...


म्हणूनच सांगावसं वाटतं 

असलीस गृहिणी तरी स्वतःला कधीही कमी लेखू नकोस..

 तुझ्यामुळेच "घराला घरपण" आहे हे

 मात्र कधी विसरू नको 

घरची गृहलक्ष्मी तूच आहे 

तुझ्या मुळे तर घरात सुख शांती आणि समाधान आहे 😊 


किती केले तरी माझी किंमत कोणालाच नाही, असा गृह मात्र करून घेऊ नकोस 

आयुष्य जगता जगता स्वच्छंदी बागडायला कधी विसरु नकोस,  

इतर स्त्रिया जातात बाहेर कामाला म्हणून स्वतःला बिनकामाची समजू नकोस  

संसाराच्या मोहजाळ्यात नेहमीच गुंतून राहते मैत्रिणींच्या घोळक्यात थोडे कधी हसून बघ  

आनंदाचे दोन क्षण का होईना स्वतःसाठी 

कधीतरी जगून बघ..

कारण  

प्रत्येक कार्यपूर्तीस नेण्याकरिता असते नेहमी तुझी गहन दृढता 

 वेदनांनाही लाज वाटावी अशी आहे तुझी सहनशीलता  

ज्ञानाचा प्रसार करणारी तूच विद्या

 शब्दातून जिवंत अशी आहे तू कविता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract