Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract

4.5  

Sarika Jinturkar

Abstract

सरत्या वर्षाने दिलेल्याजाणिवा

सरत्या वर्षाने दिलेल्याजाणिवा

2 mins
238


नवीन वर्षाचे(2020) स्वागत करण्यासाठी सज्ज झाले सगळे 

सुंदर सुरुवात वर्षाची फटाक्यांच्या आतीषबाजीने  

स्वप्नेही रंगवली सगळ्यांनी सुखद भविष्यकाळाची रे


कुठून आला अतिसुक्ष्मजीव अस्तित्व ज्याचे नाही 

उध्वस्त केले सर्वांचे जगणे केली उलथा पालत साऱ्या जगाची... सुखदुःख समान येती जाती प्रतीवर्षी 

जगावेगळे अनुभवले यावर्षी विसरण्या सारखे कदापि नाही 


पिंजऱ्यात प्राणी राहतात कसे विचार आला मनात

सुरू झाले लॉकडाऊन घरातली पावले अदृश्य बेडीत कैद झाली काही क्षणात  


शेजाऱ्याची शेजारयास भेट दुर्मिळ झाली

बंद दरवाजाआड चार भिंतीत कुटुंब सारे राहती

बघा ही कशी बिकट परिस्थिती जगासमोर आली  

चेहऱ्यावरती मास्क आणि भेदरलेले डोळे

संशयाने बघती एकमेकांना अंतर राखून सारे 


रस्ते ओस पडले, शाळा विद्यालय बंद झाली लहान बाल गोपालविना बागेतली 

फुले झाडे ही मुक झाली 

आप्तस्वकीयांचा वेदनादायी विरह सहन केला कित्येकांनी 

शत्रूवरही असा प्रसंग नको ही शिकवण सर्वांना मिळाली


माणसांत न राहून खरी माणुसकी सव॔ जण शिकले

न भेटता न कुणाच्याही घरी जाता 

ऑनलाईन एकत्र सगळेच भेटले

शिकली न नुसती तत्वे न जाणता आचरणात आणली

सहनशक्ती वाढवून संयम आला वेदना वाढलेल्या पण संवेदना सगळ्यांच्या जागृत झाल्या


कुटुंब रंगल घरात,माणसे जवळ आली होती जी दुरावली

आई सोबत वडीलांनी नवीन पदार्थ बनवण्याचे कौशल्य आत्मसात केली

आजी आजोबा सोबत रमली नातवंड घराला आले नव्याने घर पण...मंदीर बंद झाले घराघरात पुजा अच॔ना  

दरवळला धूप अगरबत्तीचा सुगंध 

सव॔ घरात पसरला अनोखा आनंद 

एकत्र कुटुंब जेवायला बसले 

हे सुंदर दृश्य पाहून घरही नव्याने हसले..घरातली जळमठ दूर करताना मनातील अडगळ ही दूर झाली...  

छंदांना जणू नवे मिळाले जीवन लॉकडाऊनच्या निमित्याने प्रत्येकाने अनुभवले सुंदर क्षण 

कोणी नाही मोठा लहान 

सगळे एकसमान म्हणून कोणी जनसेवाही केली 

गरजूंना संकटात मदत ही मिळाली 

महिन्या मागून महिने गेले" जग हादरणे हे यावषी समजले


अस्त होण्याची आली वेळ

चालू वर्षाची संपेलही ही वेळ 

व्हावा आतुर नवा सूर्य डोकावून पाहू लागला नववर्ष  

आला क्षण समीप बघा नववर्षाचा नकळे का पण... सरत्या वर्षाची हुरहूर नाही...

सरत्या वर्षाने प्रत्येकाला अनेक जाणीव दिल्या अन् शिकवले बरेच काही  


मनात कुठेतरी आहे आशा होईल पूर्वीसारखे परत 

आता दिवस मोजतोय प्रत्येक जण...

की कधी सरत हे वर्ष नव्या वर्षाच्या स्वागताला

होऊ या सारे सज्ज दूर

होईल संकट हे ,मिळेल तोच आनंद तोच हर्ष  


अन् सरतांना वर्ष हे द्वेषही अंतरातला सरावा

टाकूनी कडूपणा मनातला गोडवा आत्मसात करावा विसरुनी सारे भेदभाव आपुलकी मनी जपावी 

शिदोरी कडू-गोड आठवणींची नेहमी पाठीशी ठेवावी 

गुंफून फुलांना निराळ्या सुंदरता फुलामाळेची वाढावी करू आपलेसे नव्यांना गाठ मैत्रीची बांधावी  

उजळूनी निघावी प्रत्येक सकाळ नव्या किरणांनी 

घेऊनी मनी आशा आयुष्य बदलवण्याची  


दृष्ट वृत्तीला बाजूला सारून सत्कार्याचा अवलंब करू या

मानून सकलास आप्तजन चला बंधुभाव जोडू या 

ध्यास धरू या संकल्पाचा पूर्ण करून दाखवू या 

गेले ते विसरून सारे नव्याने सुरुवात करू या 


सरत्या वर्षाला देऊन निरोप नववर्षाचे स्वागत करू या 

मागणे माझे एकच देवाला

सुख, समाधान आनंद मिळो सर्वांच्या जीवनाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract