STORYMIRROR

Shivam Madrewar

Abstract

3  

Shivam Madrewar

Abstract

नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

2 mins
227

वैद्य त्या मानवास भयंकर रोगापासुन वाचवतो,

तोच मानव व्यसनाच्या आहारी जातो,

हे सर्व पाहता नाईलाजेने उघडले ते बार,

पण नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

तोच मानव व्यसनाने प्रत्येकालाच अपशब्द बोलतो,

व्यसनाआहारी त्या स्त्रीवरती जुलूम-अत्याचार करतो,

हे सर्व पाहता नाईलाजेने उघडले ते बार,

पण नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

मद्य विक्रीने भरमसाठ महसुल गोळा झाले,

पण जगाच्या पोशिंद्याचे शिवार पाण्याखाली गेले,

हे सर्व पाहता नाईलाजेने उघडले ते बार,

पण नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

व्यसन करून देतात ते नियमांना लाथा,

परंतु आम्ही टेकावतो देवीच्या पायी माथा,

हे सर्व पाहता नाईलाजेने उघडले ते बार,

पण नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

जेव्हा संकटे येतात, तेव्हा तोच विठ्ठल आठवतो,

प्रत्येक संकटांपासुन तोच आम्हाला वाचवतो,

हे सर्व पाहता नाईलाजेने उघडले ते बार,

पण नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

काळ्यापाशानावरही आम्ही आमचा संपुर्ण विश्वास ठेवतो,

अबोल जरी असेल तरीही मानसिक आधार देतो, 

 हे सर्व पाहता नाईलाजेने उघडले ते बार,

पण नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

व्यसनी लोकांनी व्यसन करून पसरवली महामारी,

भक्तांनी अर्चणा-उपवास करून टाळली पंढरीची वारी,

हे सर्व पाहता नाईलाजेने उघडले ते बार,

पण नाही उघडले माझ्या ह्या मंदीराचे द्वार.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract