STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract Inspirational

3  

Sarika Jinturkar

Abstract Inspirational

घड्याळ

घड्याळ

2 mins
440

पहाट समयी उठवते कवडसे नवे दाखवते

गार गार वारा दवबिंदुनी

 नटलेला हा परिसर सारा  

सकाळ अवघी नवी दिसतसे उभी स्वागता

सूर्य किरण देत असे उबदार सहारा...

  

साखर झोपेतून उठायचे नसल्यास सतत

 वाजतो घड्याळाचा गजर 

देवाचे मानून आभार, सभोवताली बघता  

सगळ्यांची लगबग सुरू सोबत घड्याळावर नजर  

घरातील भिंतीवर चिटकून राहते

नाहीतर(मोबाईल) हातात,मनगटावर बांधली जाते  

 गोल चौकोनी ठेवण,

सगळे काढतात 

 रोजच आठवण...  

होतो मग दिनक्रम सुरू

पुढे जाता क्षण जसा 

करुनिया देते प्रत्येकालाच 

अनेक गोष्टींचे स्मरण


घड्याळ सांगते आपणास गोष्ट ही खरी

काळासोबत पावले ह्याची 

असेल कोणी राजा, रंक 

वेळ नाही कुणासाठी 

होतात दिवस अन् रात्र याच कालचक्रासाठी

नाही थांबत यंत्र निर्जीव जरी 


किती वाटे मनाला जरा थांबवावेत हे घड्याळाचे काटे धावायचे ठाऊक फक्त त्यांना थांबायला वेळ तरी कुठे..?

  

मिनिट, तास, सेकंद दाखवतात 

काटे घड्याळाचे 

शिकवून जातात मानवाला सार जीवनाचे  

अन् हे काटे सांगतात वेळ दिवसाची आपल्या आयुष्यातील अनमोल अशा प्रत्येक क्षणा क्षणांच्या सेकंदाची

 जणू जन्म आणि मृत्यूला शोधण्यासाठी 

लावलेला वेळ म्हणजे घड्याळाचे काटे 

 खूप काही शिकवतात 

क्षणभर सुद्धा न थांबता 

ते फक्त चालत राहतात  

आपलं आयुष्य ही 

त्यांच्यासोबत पळत राहत

 तास मिनिटे सेकंद मोजत राहत 


करून देतात सदैव वास्तवाचं भान

 पहिल्या हुकांराला ही 

काटाच पाहिला जातो 

शेवटच्या श्वासाला ही काटाच साक्ष देतो  


सुखा माग दुख दुखा माग सुख 

न थांबता करत रहा प्रवास,

सुख दुख हे चालत राहत  


लांब सर्वात परी भारी दमाचा सेकंद काटा  

पळत जातो आवर्तने किती आणि फेर्‍या

 किती सेकंदाची करावी कशी गिनती...?


 मधल्या मधे हा सहज सरकतो 

मिनिटाची कथा येथे जो तो सांगतो  

दोन सोबती साधतात नेक दुवा 

वेळेचा सदुपयोग याच्याकडूनच शिकावा  


लहान सर्वात परि मान याचा न छोटा 

शिकवतो जगण्याचा धडा मोठा

 जीवन चक्र फिरे कधी उलटे कधी सुलटे

 मागेना फिरती कधीच घड्याळाचे काटे 


  घड्याळाचा तो टिकटिक आवाज जाणून देतो मनाला वेळेचे हे चक्र 

कधी थांबले ना कोणाला

महत्त्व कळले याचे ज्याला 

तोच घडवे तया जीवनाला

घड्याळाच्या काट्यासारखं न डगमगता 

 निरंतर चालत राहावं 

जीवनात सुख असो वा दुःख सदैव हसत राहावं...😊☺️🙏🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract