घोड कातरा
घोड कातरा
औधाचं सालं, बेजा बुहार
घोड कातरा, सारं शिवार।।
पाऊस राजा, धो धो बाज्या
सततधार, बर बरसली।।धृ।।
तूर सोयाबीन, भुईमुग शेंग
दाणे भरण्या, आधी वाळली।।१।।
ज्वारी बाजरी, मका तुर्रेधारी
टोपीत कणसं, भय अडकली।।२।।
उडीद मुंगाची, गोठचं न्यारी
कुठीसा तास, वर पास झाली।।३।।
पर्हाटीचे बोंड, जणू झाडा धों ड
धब्बाकुटी लाडू, खेळ चेंडू झाली।।४।।
जवस काऱ्हाळं, तीळाची बारी
बाळंतीण जणू, सातमाही झाली।।५।।
फक्त भाजी वालं, मटर नि आलं
हिरव्या रानी, स्वप्ने सांडली।।६।।
औधां घोड, कुतरी व्याली
घालं कुत्र्या, कुत्र्या झाली...।।७।।
