हरवली हो पाखरं
हरवली हो पाखरं
चिवचिवणारी पिल्लं
मन अतीव सुखावे
खेळ खेळताना वेळ
पळे वाऱ्याच्या वेगाने
बळ येताच पंखात
झेप घेतली गगनी
विस्तारत्या क्षितीजानी
मन भरे कौतुकानी
झगमगणारा देश
भूल पडली मायावी
परदेशी रमुनिया
आपुलकी विसरावी?
अभिमान स्वदेशाचा
कसा पडला गळुनी!!
उमलत्या पाखरांनी
का बरे जावे उडूनी?
आर्त डोळे लागलेले
पाखरांच्या देशाकडे
हरवली हो पाखरं!!
रडे माझे मन वेडे!!
