संत भगवान बाबा (पोवाडा)
संत भगवान बाबा (पोवाडा)
धन्य, धन्य भगवान बाबाला
क्रांतीसूर्याला, युगपुरुषाला
महान महाराष्ट्राच्या संताला
राष्ट्रीय प्रतिभावंत संताला
मानाचा मुजरा, त्यांच्या कार्याला! जी जी जी
जन्म झाला बीड जिल्ह्याला
सावरगाव पवित्र खेड्याला
चमत्कार काय तो झाला
संत भगवान बाबा आले जन्माला
संताचा महिमा लाभला गावाला! जी जी जी
शेतकरी कुटुंबात आले जन्माला
पाटीलकी म्हणून ओळख गावाला
मन ओढीस लागले संतसगतीला
लहान वयात वारीचा छंद जडला
देहू, आळंदी, वारकरी सोबतीला! जी जी जी
समाजसेवेत घेतले वाहून स्व:ताला
ज्ञानदानाचा वसा त्यानी घेतला
समाज जागृतीचा विडा उचलला
समाज प्रबोधन अखंड करण्याला
वेध लागले सर्व मानवजातीला! जी जी जी
लोभ नव्ह्ता त्यांच्या मनाला
संघर्ष जीवन त्यांच्या वाट्याला
अग्निपरीक्षा आली त्यांच्या वाट्याला
सत्याचा मार्ग त्यानी आचरला
सिद्ध केले संत मन जगाला! जी जी जी
भगवान गड दिमाखात शोभला
इतिहास आहे त्याच्या साक्षीला
भगवान बाबा आठवण गडाला
दैवत, समाजाचे पवित्र मातीला
जनसागर अथांग तिथे उसळला! जी जी जी
गजर रामकृष्ण हरिचा झाला
अध्यात्म शिदोरी मिळाली जोडीला
भाग्य लाभले पवित्र गडाला
प्रेरणादाई जीवन अखंड जगण्याला
शुद्ध आचरण, कष्ट करण्याला! जी जी जी
