सुख दुःख
सुख दुःख
सुख दुःख मागेपुढे
कधी सुख येता दारी
दुःख वाट बघतसे
येण्यास घरात भारी
दुःखाचे चटके सोसे
मन हळवून जाई
सुख बघता मनाला
दुःख विसरून जाई
एकमेकाची ही साथ
ना सोडे कधी जगात
कधी हास्य देई तर
कधी रडवे मनास
दुःखाने मनास पाडे
सुखाने गर्वास चढे
मानवा धीर धररे
जीवचक्र मागे पुढे
यातून जग सावरे
एकमेका पाठी धरे
कधी शांत कधी वारे
हेच ते सुख दुःख रे
