STORYMIRROR

Jayshri Dani

Others

3  

Jayshri Dani

Others

क्षण

क्षण

1 min
159

क्षण हे मोलाचे

दोन दिसांचे....

सुगंधी करीत राहिले

आयुष्याचे किनारे


कधी छळत राहिले

होऊन हळवे नाते

कधी सुखावत राहिले

क्षणांचे रेशीम पाते


नकळत घेतली कधी 

विशाल भरारी पंखांची

कधी काळी सोबत झाली

त्याच विखारी डंखाची.


गात राहिले क्षण

हळूच मिटल्या पापण्या

हळव्या स्वप्नांस छेडत गेल्या

कधी क्षणांच्या चांदण्या


Rate this content
Log in