STORYMIRROR

Jayshri Dani

Classics

4  

Jayshri Dani

Classics

सकाळ

सकाळ

1 min
219

भर थंडीत 

वर्तमानाशी नाळ जुळवत

धुक्यातून मार्ग काढत

वर्तमानपत्र 

वाटत जाणारी मुलं...


एक धसमुसळी मुलगी 

सायकल शिकण्याच्या प्रयत्नात

बाप तोल सावरायला

तिच्यामागे 

धपापून धावत...


कोवळा शीत प्रहर

आळसावलेल्या वाटांची लगबग

व्हायोलिनवर 

"झिंगल बेल झिंगल बेल "

वाजवणारी आणखीन एक मुलगी...

अनकष्टी माणसांकडे पाहणारी

शेतातली हिरवीगार सुगी


रात्र झटकून 

सकाळ झालेली

वाफाळत्या चहाच्या मोहाने

चौकात 

गर्दी फुललेली


घराबाहेर पडलेला 

प्रत्येकजण फिरत होता

चेहऱ्यावर गोठलेल्या सीमारेषेत

चिंता 

वितळवत होता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics