चिठोरं
चिठोरं
पत्रपेटीनं माझं लक्ष वेधून घेतलं
इतका न मावणारा....लाल... पिवळा लिलाफा .....
काय असेल बरं......
कोवळ्या उत्सुकतेनं मी पाकीट उघडलं.....
विस्फारल्या डोळ्यांनी मी पहातंच राहिले...
ह्याचं लग्न ठरलं....कधी.....
केव्हा....कोणाशी.....मला काहीच.....काहीच बोलला नाही........
नक्की ये......रागावू नकोस...
असे चिठोरेही होते त्यात.......
बिनमायन्याचे.......बिनसहीचे
इतका बेमालूम फसवा निघावा तो.......भावविश्वाच्या....
क्षणात....चिंधड्या....चिंधड्या उडाल्या......त्या पाकीटाच्या अन् .....चिठोऱ्याच्याही.
