STORYMIRROR

Jayesh Madhav

Abstract

3  

Jayesh Madhav

Abstract

ठरवायचे आहे

ठरवायचे आहे

1 min
287

अव्यक्त हे असे जीणे मज सोडायचे आहे

व्यक्त व्हायचे की नाही ते ठरवायचे आहे


सोडून किनाऱ्याला मज वहायचे आहे

पोहायचे कि नाही ते ठरवायचे आहे


मी जे केले नाही ते मज करायचे आहे

नक्की काय केले नाही ते ठरवायचे आहे


निरभ्र या आकाशी मज उंच उडायचे आहे

पंख लावायचे कि नाही ते ठरवायचे आहे


जीवनाच्या धावपट्टीवर मज धावायचे आहे

सराव करायचा कि नाही ते ठरवायचे आहे


शब्दांविना कविता, करणे शिकायचे आहे

हृदयात बघायचे की नाही ते ठरवायचे आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract