STORYMIRROR

Jayesh Madhav

Abstract

3  

Jayesh Madhav

Abstract

जेव्हा..

जेव्हा..

1 min
424

जेव्हा..

थकलेलं शरीर

हळूहळू चंदेरी रात्रीला

बाहुपाशात घेतं


जेव्हा..

सुंदर फुलपाखरू

रंगीबेरंगी फुलांवर

आपले पंख पसरते


एखादा चित्रकार

सफेद कागदावर

सुंदर चित्र चितारतो


जेव्हा..

खवळलेल्या सागराची

उसळलेली लाट

किनाऱ्यावर शांत होते


जेव्हा..

रडणारे मुल

आईच्या पान्ह्याने

शांत होते


तेव्हा..

हे जीवनसुद्धा

पुन्हा नव्याने

जगण्याची ताकद देते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract