STORYMIRROR

Sayli Kamble

Abstract

3  

Sayli Kamble

Abstract

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
262

जमलेत काळे ढग नि आभाळ अंधारून आलय 

आज उनाड ऊनाला सूर्याने कुठं बरं लपवलय


थंड हवा वाहत स्पर्शूनी हळूच मला बिलगतेय

पहिल्या पावसाच्या भेटीला तीही किती आतुर होतेय


पण संपली आता प्रतिक्षा पावसाची आलीच जशी पहिली सर

काहि क्षणातच पालटून टाकला तिने आजुबाजुचा सर्व परिसर


सगळा निसर्ग अचानक बहरून सुंदर दिसू लागतो

रंग नसणारा पाऊस जेव्हा त्याच्या अंतरंगात मिसळतो


हिरवा रंग पानांचा किती गडद दिसू लागतो

पावसाचा गहिरा ओलेपणा जेव्हा पानांमध्ये झिरपतो


एक वेगळाच नाद कसा कानांनाही सुखावतो

वेग वाढून पाऊस जसा बेभान होवून बरसतो


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Abstract