वाढदिवस शुभेच्छा
वाढदिवस शुभेच्छा
अक्षयदीप , दिन सोन्याचा
उगवला , तव जीवनात
सोने करावेस , कर्तृत्वाने
तू स्वप्न साकार करण्यास (१)
शिक्षणाचे पंख , मिळवुनी
घे भरारी , उंच आकाशात
विद्येसव , नीतीमत्तेसही
जाणावे , अमोल आयुष्यात (२)
स्वप्नांचे पंख , तुज नेतील
उंच अंबरी , विहरण्यास
पाय तुझे , ठेव धरेवरी
गेलास , भरारी मारण्यास (३)
माणुसकीची , जाण असावी
नित्य तव , वर्तणुकीमधे
मदत करावी , नित्यनेमे
दीनांना , संकट काळामधे (४)
जन्मदिन आज , राजसाचा
मम शुभेच्छा , दीर्घायुष्याच्या
अक्षयदीप कर्तृत्ववान
होवो ह्या , मनीषा मनीषाच्या (५)