पाऊस हवासा नकोसा
पाऊस हवासा नकोसा
पाउस हवाहवासा !
पाउस नकोसा !
तप्त तुषा
सहस्त्र जलधारानी तोषविणारा
रिते पाणवठे, नद्या, निर्झराना
अमृतधारानी नवजीवन देणारा
राना-वना, शेत-मळ्याना
संतत धारांनी फुलविणारा
रिमझीमणाऱ्या श्रावणधारांनी
सृष्टीरंग खुलविणारा
आबादानीचे दान देणारा
भूमिपुत्रांना संतोषविनारा
पाउस वाटतो हवाहवासा
ढग फुटीसारखा कोसळणारा
झोडपणारा धडकी भरवणारा
अतिवृष्टी महापूर जलप्रलयाने
हाहांकार माजविणारा
बळी घेणारा घरेझाडे कोसळविणारा
उभार शिवार जमीनदोस्त करणारा वाहतूक जनजीवन
विस्कळीत करणारा विध्वंसक
पाउस वाटतो नकोसा --!!!
