STORYMIRROR

Vijay Bhadane

Others

4  

Vijay Bhadane

Others

धरणीचे मनोगत

धरणीचे मनोगत

1 min
192

सृष्टीच्या तारणहारा !

दयाघना ! सृजनकारा !

किती विविध रूप तुझी

नयनी साठविली मी !


ग्रीष्माच्या काहिलीने अंगांग पोळता

मृगाच्या जलधारानी तोषविणार,निवविणार,सुखविणार!


आकाशी कृष्णमेघांचा 

फौजफाटा जमता 

सोसाट्याच्या वाऱ्याच,

घनगर्जना,वीजेच्या तांडवाच!


सुमुहर्तावर दमदार आगमनाने,

मन हर्षोत्फुल करणार

आशा अपेक्षच बीज पेरणार!


कधीकधी वेशीवर येतोस खरा

परंतु गावात प्रवेश करत नाही 

भरून येतोस पडत नाही अस

रुसलेल,फुगलेलं,फसवणार!


सुरवातीला वाजत गाजत येउन

धुवाधार बरसणार,ओलेत करणार 

पेरणीच द्वार मुक्त करून देणार

नंतर मात्र सुंबाल्यान तोंड लपवणार

अगतिक होउन वाट पाहायला लावणार!

 

रिमझिम जलधारानी 

प्रेमिकाना सुखावणार

सरीसरीतून चिंब करणार

मिलनरात फुलवणार,जागवणार

विरहाने पाण्यात आग पेटवणार!


कधीकधी मुसळधारानी

बेभानपणे मारझोड करत

तोंडचं पाणी पळविणाऱ्या

कोपिष्ट भ्रताराच !

अवकाळीच्या दरोडेखोराच!


नवसृजनाच्या महोत्सवाच 

बळीराजाच्या हिरव्या स्वप्नाच 

कला,गुण साहित्य निर्मितीच 

सण,उत्सवाचे रंग भरणार!


हे ऋतुराजा पर्जन्यनाथा!

तु माझा जीवनदाता,जीवनसखा 

हिरवाइच अंकुर रुजविणारा भ्रतार 

असे माझे सर्वस्व असल्याने 

 तुझ्यासाठी माझं रूप युगेयुगे 

 " याचिकेचंच ! याचिकेचंच!"


Rate this content
Log in