स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!!
असे तयाकडे धनाचा पर्वत,
पण मायेची सावली अशी नाही!
नुसती गडगंज संपत्ती,
पण खरी श्रीमंती तशी नाही!
पक्कवाने आहेत हजार,
पण भरवणारा कनवाळू हात नाही,
आजारपणात औषधे आहेत महागडी,
पण कोणी उशाशी साथ नाही!
नोकर आहेत भरपूर,
पण आपुलकीने विचारपूस नाही!
मऊ गादी व मखमली पांघरूण,
पण तिची उबदार कूस नाही!
संपूर्ण आयुष्य जगून,
पण अपूर्ण राहिली त्याच्या चित्ताची कथा;
स्वामी तिन्ही जगाचा असून, आ
ईविना भिकारी राहिला,
हीच त्याच्या जीवनाची व्यथा!!
हीच त्याच्या जीवनाची व्यथा!!!
