फितूर
फितूर
फुलपाखरासरखे रंग तुझे मोहक,
कोरे आयुष्य माझे रंगून गेले;
सागरासारखे स्थिर पण गहिरे डोळे,
तुझ्या प्रेमाचं गूज मला सांगूनी गेले!
तुझ्या सुखाच्या सोनेरी क्षणांच्या देणगीने,
झाले माझे मन पिसासरखे हलके;
चुटुकशे गुलाबी ओठ माझ्याशी बोलताना,
मन मोहवून टाकत होते तुझे हे नयन बोलके!
वाटत होते सर्व सुंदर चित्र रेखाटल्यासारखे,
पण अचानक तोल ढळला माझा, झाले मी फितूर;
उमजले जेव्हा तुला माझे हे काळे रहस्य,
तेव्हा तुझ्या एका शब्दाला झाले माझे कान आतुर!!
माझ्या या पापकर्माला, दे तुझ्या दयेची भीक,
पण तेवढ्या दानासाठी सुद्धा ठरली फटकी माझी झोळी!
एवढं सगळं कळाले असताना, तू नाही टाकलीस रे ठिणगी;
तरी पण पश्चातापामध्ये पेटली आहे जीवाची होळी!!!
माझी क्षमायाचना तू कधीतरी स्वीकार रे राजसा;
विरळ झालेल्या या नात्याला होऊ दे रे पुन्हा दाट!
वेळेचे तुला बंधन घालणे, आता माझा हक्क नाही...
पण तरीही तुझ्या हृदयाच्या बंद दारासमोर पाहते मी तुझी वाट...
पण तरीही तुझ्या हृदयाच्या बंद दारासमोर पाहते मी तुझी वाट...!!!!

