STORYMIRROR

Dr.Riddhi Jadhav

Romance Tragedy

3  

Dr.Riddhi Jadhav

Romance Tragedy

काचेचे हृदय

काचेचे हृदय

1 min
168

वय होते माझे अल्लड, अवखळ ,नादान ,

यौवनाचे वारे शरीरावर मनोरा फुलवत ,

काचेसारख्या स्वच्छ माझ्या हृदयाला;

कुठलीही अज्ञान व्यक्ती कशी ही झुलवत!!

प्रेमाच्या शोध मोहिमे अंती तू मला भेटलास,

तुझ्या त्या मधुर वाणी आणि मंजूळ शब्दांवर मन हे भुलले;

ऊन पावसाचे तडाखे बसून फुल कोमेजणारच होते रे ,

तितक्यात तुझ्या आश्वासनांवर आयुष्य माझे खुलले.

प्रारंभीचे काही क्षण सुख वास देउन गेले ,

आपल्या मधले अंतर जणू राहिला होता एक श्वास !

तुझ्या मध्ये मी इतकी कसे गुंतले रे सख्या?

माझ्या निष्पाप हृदयाचा राजा झाला होता तू खास!!

पण वेळेची अवकळा येऊन दुःखाचे दिवस आले होते परत

आता तुझेच रागीट शब्द करत होते काळजावर तलवारीचा घाव ;

रोजचे भांडण तंटे सहन न होऊन झाले होतो आपण दूर

नशिबाने मांडला होता भातुकलीचा खेळ आणि संपला होता डाव!!

तुझ्या वाचून हे जीवन , हा विरह सहन होत नाही;

पण पुन्हा कुणाशी तरी जवळीक साधण्याची हिम्मत ही नाही!

हृदयाच्या विखुरलेल्या काचेच्या तुकड्यांना जोडू तरी कशाला??

या प्रेमाच्या बाजारात त्यांची आता तशी किंमत ही नाही....

त्यांची आता तशी किंमत ही नाही!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance