इंद्रधनू
इंद्रधनू
माझ्या मनाचं कोंदण
तुजसाठीचं आंदण...
साऱ्या विश्वावर माझ्या
तुझ्या छायेचं गोंदण..
गोंदणाचे रंग जणू
सप्तरंगी इंद्रधनू...
इंद्रधनूच्या झुल्यात
माझं फुलत झुलणं...
नभ येताच दाटून
चित्त होई वेडेपिसे..
घनदाट सावल्यांत
तुझेच की कवडसे...
भिनू लागे माझ्याठायी
त्याचं चांदणं चांदणं....
माझ्या मनाचं कोंदण
तुजसाठीचं आंदण

