इंद्रधनू
इंद्रधनू
अशाच एका सायंकाळी
जुळून आली नवीन नाती
दिसले होते गुलाब गाली
दाटुनि नयनी आली प्रीती
क्षितिजी शोभे असा रक्तिमा
भाळून जाई सांजवेळही
तिच्या ललाटी येई चांदवा
लज्जेने ती चुर आजही
नकळे तिजला वेड कशाचे
घेऊन येई गोड शिरशिरी
सजुन बावरी अधीर वेळा
चांदण्याची गं शाल पांघरी
गहिवरली ती सायंवेळा
पुनःपुन्हा तो लटका चाळा
जिवाशिवाचे अजोड नाते
लावित राही रम्य लळा
मनात भय हे कधीच नव्हते
जाणिव होती अद्वैताची
अतूट नाते असेच असता
उणीव न भासे क्षितिजाची

