मैत्र
मैत्र
1 min
242
चल जाऊया पुन्हा एकदा त्याच तळ्याकाठी
येतील तेथे अजुनि श्रवणी आपुल्या गुजगोष्टी
अवखळ वारा तिथे हुंदडे होऊनिया कोकरू
त्या वाऱ्यातच खुलली मैत्री मन झाले पाखरू
नाव सोडली पाण्यामध्ये विहरत ती जाई
त्या लहरींच्या साथीने मग मौन बोलके होई
अशी आठवे घेती कवळुनि मजला वेळोवेळी
दिसते अजुनि पाण्यातील ती मोहक मासोळी
तिथे जाऊनि करू साजरा उत्सव मैत्रीचा
पुन्हा एकदा खेळ खेळूया रुसण्या फुगण्याचा
पायवाट कधी जाईल घेऊन त्याच तळ्याकाठी
हीच प्रतिक्षा भारतसे मम मन काठोकाठी
