डोळ्यात माझ्या भाव नवे
डोळ्यात माझ्या भाव नवे
डोळ्यात माझ्या भाव नवे
सांग मजला तुज काय हवे ।
विस्तीर्ण किती आकाश सवे
लक्षवेधी तिथे पक्षांचे थवे ।
नभ एक काळा मधेच डोकावे
होऊन पाऊस का त्याने यावे ।
अंथरतो मग तो ओली चादर
वाटे मज त्यात भिजून घ्यावे ।
मग होऊन अंकुर हळूच यावे
पसरूनी हिरवळ निसर्ग व्हावे ।
वाऱ्यासंगे मग थोडे झुलावे
फुल होऊन मीही बहारावे ।