साथ तुझी …
साथ तुझी …
कसं असतं हे जीवन सांग प्रियकरा ?
वैशाखातल्या रणरणत्या उन्हासारखं की
श्रावणातल्या कोवळ्या कवडसासारखं
आयुष्यातल्या भट्टीत कधी हे पोळून निघत
कधी प्रियकराच्या प्रेमळ सहवासात न्हाऊन निघत
सुख दुःख येतच राहतात
पण प्रत्येक क्षणी ते खंबीर नाही राहत
कधी वृक्षाच्या दाट छायेत विसावत
कधी गुलाबाच्या काट्यासोबत माखून जात
कधी कोलमडून पडतं
कधी धडपडून उठण्याचा प्रयत्न करत
तरी नाही थांबत कारण
जीवन आहे चक्र न थांबणार, न मागे पळणार
म्हणूनच आरूढ होऊन जगायचं
भविष्याच्या रंगीबेरंगी पंखांवर
असंच असतं ना जीवन
की याहून काही वेगळ आहे ?
पण एक मात्र नक्की
जीवनभर साथ असेल तुझी
तर यशाच्या प्रत्येक पावलावर जीत आहे
जीवनात सुखद गोडवा आहे
तुझ्याविना हे जीवन भकास रानमाळ आहे
नाहीतर रणांगण आहेच खास
म्हणूनच आस आहे मनी
तुझी साथ लाभू दे जन्मोजन्मी

