Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

4.2  

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

महाराष्ट्र आमुचा

महाराष्ट्र आमुचा

1 min
228


🔹महाराष्ट्र आमुचा मान , महाराष्ट्र आमुचि शान ,

🔹महाराष्ट्र हा सकल भरतभूमीचा सन्मान ,

🔹महाराष्ट्र म्हणजे ओवी ज्ञानेशाची,

🔹महाराष्ट्र म्हणजे अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची,

🔹महाराष्ट्र म्हणजे लावणी, पोवाडा अन तमाशा, 

🔹महाराष्ट्र म्हणजे लोकसंस्कृतीच्या जिवंत खाणाखुणा,

🔹महाराष्ट्र म्हणजे छत्रपतींचा अतुल्य पराक्रम,

महाराष्ट्र म्हणजे औरंगजेब, सिद्धी यांचा दारुण पराभव,

🔹महाराष्ट्र म्हणजे फुले, शाहू यांचा जातीयतेवरील घणाघाती हल्ला ,

🔹महाराष्ट्र म्हणजे पंढरीच्या वारकऱ्यांचा भक्तिरसात न्हालेला मळा,

🔹महाराष्ट्र म्हणजे क्रांतीची अखंड तेवणारी ज्योत, 

🔹महाराष्ट्र म्हणजे सावरकरांच्या वेदनादायी आठवणींची अंदमानातील जन्मठेप,

🔹महाराष्ट्र म्हणजे जिजाऊ, सावित्री च्या संस्काररुपी शिक्षणाचा वारसा ,

🔹महाराष्ट्र म्हणजे सरस, सोज्वळ 

बहिणाबाईंच्या काव्यातील विलक्षण गोडवा,

🔹महाराष्ट्र म्हणजे लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव,

🔹महाराष्ट्र म्हणजे दिवाळी, दसरा आणि चाकरमान्यांचा शिमगोत्सव, 

🔹महाराष्ट्र म्हणजे संविधानाचे शिल्पकार म्हणून ख्याती असलेले पहिले कायदेमंत्री,

🔹महाराष्ट्र म्हणजे हिमालयाच्या मदतीला धावून गेलेले पहिले मुख्यमंत्री,

🔹महाराष्ट्र म्हणजे लोकोत्तर साहित्यिकांचे प्रतिभासंपन्न अक्षरधन,

🔹महाराष्ट्र म्हणजे कुष्ठरोग्यांना सावरणारे आनंदवन,

🔹महाराष्ट्र म्हणजे रसरशीत हिरवागार निसर्ग,

🔹महाराष्ट्र म्हणजे गड, किल्ले आणि समुद्रदुर्ग,

🔹महाराष्ट्र म्हणजे कबड्डी, खो-खो आणि लाल मातीतील कुस्ती,

🔹महाराष्ट्र म्हणजे माया,ममता, विश्वासाची अनिवार प्रीती, 

🔹असा हा मरहट्ट, महाराष्ट्र प्रिय आम्हाला सदा, 

🔹कर्तृत्वाने महाराष्ट्राचा जगावर उमटवू ठसा ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational