Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

3.8  

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

सैनिक माझे नाव….

सैनिक माझे नाव….

1 min
259


सैनिक माझे नाव मानवा ,सैनिक माझे नाव ,

समरपुर हे माझे गाव, सैनिक माझे नाव ||१||


देशाचा मी तत्पर सेवक, करितो रक्षा सरहद्दीची,

पांग फेडतो मातृभूमीचे,छातीवरती झेलून गोळी ||२||


ऊन, पाऊस, वादळ, थंडी, अंगावरती झेलत वारे,

प्राणपणाने करितो शर्थ,कुटुंबकबिला ठेवून मागे ||३||


पराभवाची धूळ चारतो, तिरंग्याचा मान ठेवतो,

निष्ठूर शत्रू असे जरी, प्रेमाने ही जिंकून घेतो ||४||


एकच इच्छा मनी वसे, परमवीर चक्र स्वप्नी दिसे,

त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी, देहत्यागना अधीर असतो ||५||


विजय किंवा वीरगती, ही ललकारी ठरे महान,

धैर्य ,शौर्य अन समर्पणाचे दुसरे नाव शूर जवान ||६||


इंच इंच लढतो भूमी, श्वास असेतो शेवटचा ,

या रक्ताची, बलिदानाची शपथ तुला मानवा ||७||


धर्म, राज्य, प्रांत, भाषा भेदभाव हा करू नका,

सत्य, अहिंसा, प्रेम, शांतता, बुद्ध, बापूंचा मार्ग धरा ||८||


या देशाची अखंडता, संस्कृती अन विभिन्नता,

मोल स्वातंत्र्याचे जाण माणसा, जपून ठेव हा पुण्य वारसा ||९||


पारतंत्र्याचे फेकून जोखड, श्वास मोकळे केले ज्यांनी,

त्या वीरांना, देशभक्तांना त्रिवार वंदन नमन करा ||१०||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational