Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

4.4  

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

कोरोना आणि निसर्ग

कोरोना आणि निसर्ग

1 min
468


बंद! बंद! बंद! आहे आता कडकडीत बंद !       

कोरोना विषाणूने केला कहर    

संपूर्ण जगावरच त्याचा झाला मोठा असर                 

लॉकडाऊनची गंभीर स्थिती    

अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडून गेली 

बाजारात धान्याचा तुटवडा   

गरिबाला तर मिळेना झाला भाकरीचा तुकडा               

शिवथाळी, कमळथाळी असली तरी 

द्रौपदीची थाळी देशाला हवी   

त्यातूनही मदतीचे हात हळू हळू पुढे सरसावले             

देशातील देवदूतांत माणुसकीचे दर्शन घडले               

अशातही भ्रष्टाचार, काळाबाजार होतोय             

कष्टकऱ्यांच्या नशिबी कायम उपास घडतोय 

अभूतपूर्व अशी ही स्थिती बदलणार कधी ? 

कोरोनावर विजय मिळणार कधी ? 

डॉक्टर, आरोग्य सेवक रुग्णांचे वाचवताहेत प्राण 

आपणही नियम पाळून त्यांना सहकार्य करू छान! 

पण….. 

एक मात्र फायदा जगाला नक्की झाला 

निसर्गालाही मोकळा श्वास घेता आला 

प्रदूषण नाही, केर कचऱ्याचे साम्राज्य नाही 

गंगा पवित्र झाली, समुद्राची ही स्थिती सुधारली 

पक्षी मुक्तपणे गुणगुणू लागले 

शेरखानही रस्त्यावर बिनधास्त विसावले 

माणसाने अंतर्मनात डोकावयालाच जणू 

कोरोनाने पाऊल टाकले 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आता

माणूस थोडा थांबला खरा 

पण निसर्गाने शिकवला त्याला चांगलाच धडा 

आता कुठे कळले त्याला 

महत्त्व ऑक्सिजनचे आणि झाडांचे

पण तरीही करेल का तो संवर्धन पर्यावरणाचे

म्हणुनच थोडं थांबू या 

जागरूकपणे विचार करू या 

निसर्गाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवू या…. 

चला तर मग पर्यावरण दिनाच्या निमित्ताने

तुकोबांप्रमाणेच झाडे, वने, पशू पक्षी 

यांना आपले सगे सोयरे करूया अन

प्रत्येक झाडाचे महत्त्व सांगून त्यांना 

पूजनीय मानणाऱ्या

भारतीय संस्कृतीचा आदर्श इतरांपुढे ठेवू या…….


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational