STORYMIRROR

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

3  

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

मैत्री असावी अशी...

मैत्री असावी अशी...

1 min
242

बालपणीची वा ऐन तारुण्यातली 

मैत्री असावी 

मनाला मनाशी जोडणारी 


कोणत्याही जाती धर्मातल्या जीवाशी 

मैत्री असावी 

करुणा  सहृदयता जपणारी 


समवयस्क स्त्री असो वा पुरुषाशी 

मैत्री असावी 

लिंगभेदा पलीकडील मानवता जगणारी 


दीन दलित वा उच्च पंडित 

मैत्री असावी

आत्म्याच्या, हृदयाच्या श्रीमंतीची 


मैत्री

गंध जपते आठवणींचा 

आधार होते सुख दुःखांचा 

मैत्री 

तळपत्या उन्हातली सुखद सावली 

पहिल्या पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी 

मैत्री 

हसायला शिकवतेच पण रडतानाही जगायला शिकवते मैत्रीचे नाते हे असे ज्याला लाभे 

सुगंधित पारिजातकाचा सडा त्याच्या अंगणी नित्य पडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational