STORYMIRROR

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

3  

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

तुझी खंत

तुझी खंत

1 min
219

तुझ्या भावना समजूच शकले नाही

हीच खंत नेहमी तुझी

पण तुला काय माहित?

तुला समजून घेण्यातच आयुष्य खर्ची घातले मी


तुझ्यावर खरं प्रेम करूच शकले नाही

हीच खंत नेहमी तुझी

पण तुला काय माहित?

तुला नजरेत साठवूनच दिवसाचे सारे क्षण घालवले मी


तुझ्या माणसांना आपले म्हणूच शकले नाही

हीच खंत नेहमी तुझी

पण तुला काय माहित?

आपल्या माणसांबद्दल कधी अवाक्षरही खपवून घेतले नाही मी


संसाराच्या वाटेवरच तुला एकट्याला सोडून जाईन

हीच खंत नेहमी तुझी

पण तुला काय माहित?

तुझ्याबरोबर संसार करण्याची एक नाही तर

सात जन्मांची तयारी आहे माझी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational