काहीतरी हरवलंय
काहीतरी हरवलंय
कित्येकदा मनाच्या डायरीत
तुझे नाव गिरवलय
पुन्हा डायरी उघडताना
वाटतेय काहीतरी हरवलंय
बदलणाऱ्या नात्यांसाठी
माझे मन सरावलय
तुलाही बदलताना पाहून
वाटतेय काहीतरी हरवलंय
तू नाहीस माझा
हे मनाने ठरवलंय
तुला दुसऱ्यासोबत पाहताना
वाटतेय काहीतरी हरवलंय
आज आयुष्याला माझ्या
स्तुतीसुमनानी गौरवलय
मागे वळून पाहताना
वाटतेय काहीतरी हरवलंय

