ती
ती
नदीचा काठ आहे ती
रतीचा थाट आहे ती
हळवी पहाट आहे ती
कलाचा घाट आहे ती
गुलाबी फूल आहे ती
हासरे मूल आहे ती
सुवर्णी डूल आहे ती
मजला कबूल आहे ती
जीवाचा प्राण आहे ती
मदनाचा बाण आहे ती
रत्नांची खाण आहे ती
प्रीतीचे तुफान आहे ती
पेटला जाळ आहे ती
फुलांची माळ आहे ती
बोलकी चाळ आहे ती
सुने आभाळ आहे ती
वणव्याची आग आहे ती
भूपाळी राग आहे ती
सळसळता नाग आहे ती
हृदयाचा भाग आहे ती
पावसाची धार आहे ती
मनाला आधार आहे ती
फुलांचे बहार आहे ती
रेशमी किनार आहे ती
चांदणी रात आहे ती
दिव्यांची वात आहे ती
एक झंझावात आहे ती
नवीन सुरुवात आहे ती
एक कहाणी आहे ती
सुरेल गाणी आहे ती
वाहते पाणी आहे ती
माझीच राणी आहे ती

