पहिला पाऊस
पहिला पाऊस
पहिला तो पाऊस पहिला तो प्रवास
अनोळख्या आठवणीतला सहवास
पावसाची सर ट्रेनचा आवाज सारा
तुझी खिड़कीकडे नजर सुसाट वारा
सरीवर सरी वातावरण बेभान
नजरेला नजर पावसाचा नाही भान
त्या वातावरणाशी मी नाही गाफिल
मगविला चहा अन् सुरू मैफिल
संवाद बहरत गेला हळूवार कळू लागले
पडणारे थेंबही मैफिलीशी जळू लागले
पाऊस नि प्रवासाप्रचा योगायोग
टीसी फेरेवाल्याचा खरच राग आला
आठवणीने सवांदही उजाळू लागले
नजरेला मनही छळू लागले
जेव्हा पाऊस थांबण्याचा भास
क्षणभरासाठी रोखला जाई श्वास
प्रत्येक प्रवासाला तो पाऊस दाटून येतो
नकळत त्या आठवणीना भेटून जातो
खंत आहे तो पाऊस तेथेच थांबला ?
जाऊ दे पावसामुळे सहवास तर लाभला

