मिटू नको पापणी
मिटू नको पापणी
मिटू नको पापणी, मज राहू दे डोळ्यात या
प्रीत ही साजणी मज पाहू दे डोळ्यात या
लाजरे फूल हे
पाहते पानातूनी
गंध हा सांगतो
गुज हे कानातूनी
हा टिळा कुंकूमी
शोभतो भाळास या
मिटू नको पापणी, मज राहू दे डोळ्यात या
प्रीत ही साजणी मज पाहू दे डोळ्यात या
मन कसे धावते
सांग तू पहाऱ्यातूनी
स्पर्श हा रेशमी
धुंद मी शहाऱ्यातूनी
मज कळेना कसा
गुंतलो जाळ्यात या
मिटू नको पापणी, मज राहू दे डोळ्यात या
प्रीत ही साजणी मज पाहू दे डोळ्यात या
दुनियेस विसरुनी
रंगू या स्वप्नातूनी
मनमोहक इंद्रधनू
जाऊ या गगनातूनी
क्षण क्षणास अडवूनी
थांबवू काळास या
मिटू नको पापणी, मज राहू दे डोळ्यात या
प्रीत ही साजणी मज पाहू दे डोळ्यात या

