Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Suvarna Patukale

Romance


4.0  

Suvarna Patukale

Romance


दरवळ

दरवळ

1 min 160 1 min 160

मंद झुळुक ही, येतो सरसर

अंगावरती काटा

आली कुठूनी दरवळ

गेली गंधीत करूनी वाटा

हिरव्या रानी, कुजबुज कानी

बहरून धरती, गाते गाणी

आले लहरी वारे

डुलती तरूवर भिजल्या शाखा

आली कुठून दरवळ

गेली गंधीत करूनी वाटा


क्षितिजावरती झुकते अंबर

सरितेलाही भेटे सागर

आले धावत तरंग

हसती खळखळूनी या लाटा

आली कुठून दरवळ

गेली गंधीत करूनी वाटा


कृष्ण बावरी राधा आणि

कळी भ्रमराची तीच कहाणी

जीवन अर्पून करी अमर ती

प्रीतच जाता जाता

आली कुठून दरवळ

गेली गंधीत करूनी वाटा


Rate this content
Log in

More marathi poem from Suvarna Patukale

Similar marathi poem from Romance