STORYMIRROR

Suvarna Patukale

Others

3  

Suvarna Patukale

Others

रिमझिम ही बरसात

रिमझिम ही बरसात

1 min
165

गंध मातीचा आज अंगणी, फिरला गाणे गात

धुंद सरी या नाचत आल्या रिमझिम ही बरसात

मेघ गडगडून, वीज कडकडून आज काय बोलले

धरती ही पदरात आपुल्या, थेंब थेंब झेलते

हिरवे स्वप्नही फुलून आले वसूनिया नयनात

धुंद सरी या नाचत आल्या रिमझिम ही बरसात

अंग थरथरे, पिसे फुलारून वनी कोण नाचते

प्रेम ग्रंथ प्रत्येक घनाचा जलधारा वाचते

विसरूनी सारे देहभान हे हरवलेत भिजण्यात

धुंद सरी या नाचत आल्या रिमझिम ही बरसात

नक्षत्र स्वातीचे, देत मोतीया शिंपल्यात आकार

चातका तुझी तहान मिटली, पिऊन वर्षाधार

मन भरले, अवतरले पाहून, जीवन कणाकणात

धुंद सरी या नाचत आल्या रिमझिम ही बरसात


Rate this content
Log in