हेच मागणे देवा
हेच मागणे देवा
1 min
244
हेच मागणे देवा
तुझा कधीही विसर न व्हावा
हेच मागणे देवा
तू दाता अन् तूच विधाता
बालक मी तव, तू मम माता
अज्ञान मनीचे दूर करून दे
ज्ञान धनाचा ठेवा....देवा
हेच मागणे देवा
वैर कुणाशी.. कधी ना व्हावे
संकटातही हसत रहावे
तुझीच करुणा सदा वाहू दे
नको कुणाचा हेवा.... देवा
हेच मागणे देवा
अपराधी मी क्षमावंत तू
कृपासागरा... दयावंत तू
वाट आम्हाला दाखव, घडू दे
तव चरणांची सेवा... देवा
हेच मागणे देवा